आंतरराष्ट्रीय स्टार प्रियांका चोप्रानं ‘क्वांटिको’च्या तिसऱ्या सीझनसाठी तयारी सुरू केली आहे. ती साकारत असलेल्या अलेक्स पॅरिशचा या नवीन सीझनमध्ये एकदम हटके लूक असणार आहे. त्यासाठी या देसी गर्लनं चक्क तिचे केस कापले आहेत. मालिकेसाठी काय पण असं म्हणत तिनं हा निर्णय घेतलाय म्हणे. 'बाय बाय लांब केस' असं सोशल मीडियावर लिहित लवकरच नवीन लूक दाखवणार असल्याचं आश्वासनही तिनं चाहत्यांना दिलंय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews